आयुष्मान खुराणाच्या चाहत्यांसाठी खुशखबर, ‘बधाई हो’चा सिक्वल येणार


अभिनेता आयुष्मान खुराणाने ‘अंधाधुन’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकवला आहे. मागील वर्षी देखील त्याच्या ‘बधाई हो’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच या चित्रपटात प्रमुख भूमिका असणाऱ्या सुरेखा सीकरीने देखील राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केला होता.

‘बधाई हो’ ला प्रेक्षकांकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आता निर्मात्यांनी एक नवीन खुलासा केला आहे. यानुसार ‘बधाई हो’ चा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बधाई हो’ च्या सिक्वलची तयारी सध्या जोरात सुरू आहे.

जंगली पिक्चर्सद्वारे निर्मिती करण्यात आलेल्या या चित्रपटाचे निर्माते विनीत जैन म्हणाले की, जंगली पिक्चर्स नेहमीच प्रभावशील कथांना मनोरंजन पध्दतीने मोठ्या पडद्यांवर आणण्यासाठी प्रयत्न करत असते. राष्ट्रीय पुरस्काराद्वारे मिळालेली ओळख आणि सन्मान नक्कीच सुखद आहे. एक चांगला चित्रपट बनवल्याने मला माझ्या टीमवर गर्व आहे.

सांगण्यात येत आहे की, चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिण्यात आली असून, आता बधाई हो चित्रपटाच्या सिक्वलचे नाव बधाई हो ठेवण्यात आले आहे. तसेच चित्रपटाची कास्टिंग देखील सुरू झाली आहे. तसेच चित्रपटाची शुटिंग पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे.

‘बधाई हो’ हा चित्रपट मागील वर्षी सुपर हिट ठरला होता. त्यामुळे या चित्रपटाचे सिक्वलबरोबरच रिमेक देखील केले जात आहे. बधाई हो चे रिमेक तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत बनत आहेत

Leave a Comment