शहीद मुलाच्या पुतळ्यावरील या माऊलीचे प्रेम बघून तुमच्या डोळ्यात अश्रू येतील


नक्षवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या आपल्या एकलुत्या एक मुलाच्या आठवणी जिंवत ठेवण्यासाठी आईने शहीद मुलाचा पुतळा उभारण्याची इच्छा व्यक्त केली. मुलाच्या प्रती असलेले हे प्रेम बघून वडिलांनी देखील घराच्या अंगणामध्ये मांडव टाकत मुलाचा पुतळा उभारला आहे. या पुतळ्यावर शहीद मुलाची आई आपल्या मुलावर लहानबाळाप्रमाणेच प्रेम करते. हे दृश्य बघून आजही लोकांच्या डोळ्यात अश्रू येतात.

19 ऑगस्ट 2011 ला नक्षवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात कॉन्स्टेबल बसील टोप्पो शहीद झाले. शहीद कॉन्सटेबल बसील टोप्पोचे वडील निर्मल टोप्पो यांनी सांगितले की, छत्तीसगढच्या जशपूर जिल्ह्यातील पेरूवांआरा या छोट्याशा गावात जन्मलेल्या बसीलला लहानपणापासूनच पोलिस आणि सैन्यात भर्ती होऊन देशाची सेवा करायची होती. 12 वीचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तो जिल्हा पोलिसात भर्ती झाला. पहिलीच पोस्टिंग नक्सली भाग असलेल्या बस्तरच्या बीजापूर येथे होते.
2011 मध्ये बसीलची पोस्टिग बिजापूरच्या भद्रकाली स्टेशनमध्ये करण्यात आली. ऑगस्ट 2011 मध्ये 15 दिवसांची सुट्टी घेऊन तो घरी आला होता. मात्र अचानक आठवड्याच सुट्टी संपल्याची सुचना मिळाली आणि हेडक्वार्टर जाण्यास सांगण्यात आले. 19 ऑगस्ट 2011 ला आपल्या 11 साथीदारांबरोबर भोपालपट्टनमवरून भद्रकाली कँम्प येथे जात होते. त्याच वेळी नक्शलवाद्यांनी त्यांच्या वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात बसील आणि त्यांचे तीन साथीदार शहीद झाले.

वडिलांनी सांगितले की, बसीलच्या मृत्यूच्या बातमीने आम्ही दुखी झालो. त्याची आई त्याचा मृत्यू झाला हे मान्य करायला तयारच नव्हती. शेवटी त्यांनी ईच्छा व्यक्त केली की, घराच्या अंगणातच मुलाच्या आठवणीत एक स्मारक बनवावे. त्यांची ईच्छा पुर्ण करण्यासाठी आणि मुलाची शहादत अमर ठेवण्यासाठी मुर्तीकाराच्या शोधात मी ओडिसापर्यंत गेलो. अखेर मुर्ती तयार केली आणि मांडव बांधत तिला स्थापित करण्यात आले. आता शहीद बसीलची आई या मुर्तीवर अक्षरशः आपल्या मुलावरच माया करत आहे अशा प्रकारे प्रेम करते, त्याची काळजी घेते. हे बघून डोळ्यात अश्रू येतात.
स्थानिक गावकऱ्यांचे देखील शहीद बसीलबरोबर तेवढेच जिव्हाळ्याचे नाते दिसून येते. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी सर्वप्रथम शहीद जवानाच्या पुतळ्याला राखी बांधतात. शहीद जवानाच्या वीरतेला जिंवत ठेवण्यासाठी त्यांच्या नावाने गावात खेळांच्या स्पर्धेचे देखील आयोजन केले जाते.

Leave a Comment