अभिनेत्री श्वेता तिवारीच्या दुसऱ्या पतीला मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक


पती अभिनव कोहलीविरोधात मुलीचा विनयभंग आणि कौटुंबिक हिंसाचाराचा अभिनेत्री श्वेता तिवारीने आरोप केला आहे. अभिनव कोहलीला पोलिसांनी या प्रकरणी श्वेताच्या तक्रारीनंतर अटक केली आहे. श्वेताच्या आरोपानुसार, कायमच अभिनव दारुच्या नशेत असतो. 18 वर्षीय सावत्र मुलगी पलकला त्याने शिवीगाळ करत तिला मारहाण केली.

रविवारी (11 ऑगस्ट) मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास अभिनवला मुंबईतील समतानगर पोलिस स्टेशनमध्ये आणले आणि त्याची श्वेता-पलकच्या उपस्थितीत चार तास चौकशी केली. पोलिसांनी यानंतर श्वेताच्या तक्रारीनंतर अभिनवविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक करुन पोलिस पुढील तपास करत आहेत.

सावत्र मुलगी पलकला अभिनवने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. श्वेताच्या आरोपांनुसार माझ्या आणि पलकसोबत अभिनव नेहमी गैरवर्तणूक करायचा. त्याचबरोबर पलकला त्याच्या मोबाईलमध्ये एका मॉडेलचा अश्लील फोटोही अभिनवने दाखवला होता. पण पलकवर हात उचलल्याने पाणी डोक्यावरुन गेल्यामुळे प्रकरण पोलिसांपर्यंत नेण्याशिवाय पर्याय नव्हता.

Leave a Comment