बेअर ग्रील्सला एक बेडूक पडला होता ४ लाखाला


१२ ऑगस्ट रोजी रात्री ९ वा. डिस्कव्हरी चॅनलवरून प्रसारित होत असलेल्या मॅन व्हर्सेस वाइल्ड मध्ये आज बेअर ग्रील्स सोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जंगलदरीतून भटकंती करताना दिसणार आहेत. या बेअर ग्रील्स संदर्भातील एक मजेदार हकीकत अनेकांना माहिती नसेल. एक बेडूक खाल्ला म्हणून याच बेअरला चक्क ४ लाख रुपये दंड भरावा लागला होता.

बेअर ग्रील्स नेहमीच पशुप्रेमी लोकांच्या निशाण्यावर असतो. त्याच्या विरोधात अनेकदा तक्रारी दाखल केल्या आहेत आणि त्याच्याविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल आहेत. २०१५ मध्ये त्याच्यावर टीव्हीचे रेटिंग वाढावे यासाठी कॅमेऱ्यासमोर त्याने प्राणी मारून मुद्धाम खाल्ल्याचा आरोप केला गेला होता. २०१९ फेब्रुवारी मध्ये तो बुल्गारियाच्या राष्ट्रीय उद्यानात शोचे शुटींग करत असताना त्याने तेथील सरोवरातून एक बेडूक पकडला आणि भाजून खाल्ला. त्याला हा बेडूक ४ लाखाला पडला.

याचे कारण म्हणजे या उद्यानातील हे विशेष सरोवर संरक्षित असून तेथे शिकार करणे किंवा आग पेटविण्यास बंदी आहे. या नियमाची कल्पना असूनही ग्रील्सने सरोवरातून बेडकाची शिकार केली आणि याच उद्यानात आग पेटविली. त्यामुळे पर्यावरण मंत्रालयाने त्याला व त्याच्या शोवर ४ लाख रुपये दंड वसूल केला.

बेअर ग्रील्स ब्रिटनच्या प्रतिष्ठीत कुटुंबातील आहे. त्याचे वडील राजकारणी होते तर आजोबा प्रसिद्ध क्रिकेटपटू होते. ग्रील्स यानेही अनेक बहारदार कार्यक्रम टीव्हीवर सादर केले आहेत. त्याने ब्रिटीश लष्करात नोकरी केली असून १९९४ ते १९९७ या काळात ब्रिटीश लष्करात सेवा दिली आहे.

Leave a Comment