सोशल मीडियात स्मिता गोंदकरचा हाहाकार


‘पप्पी दे पारूला’ या गाण्यामुळे आणि बिग बॉस मराठी पहिल्या पर्वामुळे अभिनेत्री स्मिता गोंदकर चर्चेत आली होती. पण स्मिता आपल्या बोल्ड लूक, दिलखेचक अदा, ग्लॅमरस अंदाज यासाठी विशेष ओळखली जाते. स्मिताचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. स्मिताने नुकतेच तिचे बिकिनीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्मिताने बिकिनीमधील काही फोटो शेअर केले आहेत. स्मिता या फोटोमध्ये अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. अनेकांची मने तिच्या या फोटोंनी जिंकली असून सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. तिच्यावर तिच्या चाहत्यांनी कमेंटचा वर्षावदेखील केला आहे.


स्मिता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ये रे ये रे पैसा २’ या चित्रपटात झळकली होती. अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हृषिकेश कोळी यांनी पटकथा संवाद लेखन केले. या चित्रपटात अभिनेते संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार अशी दमदार स्टारकास्ट आहे. गायक अवधूत गुप्ते, मुग्धा कऱ्हाडे, शाल्मली खोलगडे आणि मिक्का सिंग यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत.


लवकरच राजू मिश्रा यांच्या ‘लव्ह बेटिंग’ या चित्रपटामध्ये स्मिता दिसणार आहे. स्मितासह या चित्रपटात चिराग पाटील, काजल शर्मा, सायली शिंदे, अनंत जोग, राजेश श्रृगांरपूरे, कमलेश सावंत, वैभव मांगले आणि अनिकेत केळकर हे देखील दिसणार आहेत.