कोल्ह्याने बनविले रेकॉर्ड


कोणतेही रेकॉर्ड म्हटले कि चटकन आपल्या नजरेसमोर माणूस येतो. पण आता एका प्राण्यानेही रेकॉर्ड नोंदविल्याची घटना नॉर्वे मध्ये घडली आहे. एका विशेष प्रकारच्या कोल्ह्याने चार महिन्यात माणूस कल्पनाही करू शकणार नाही इतके अंतर पायी पार केले आहे. या जातीच्या कोल्ह्याला निळा कोल्हा असे म्हटले जाते.

नॉर्वे येथील स्वल्बार्ड द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट स्पीटसबर्ग मधून चक्क २७०० मैलांचे अंतर कापून हा कोल्हा कॅनडातील नुनवत मध्ये एलेस्मेरे बेटावर पोहोचला. कोणत्याची जातीच्या प्राण्याने केलेला हा सर्वात दीर्घ प्रवास आहे. नॉर्वेच्या पोलर इन्स्टिट्यूट मधील संशोधकांनी प्रथम २०१७ मध्ये या कोल्ह्याला ट्रॅकिंग कॉलर लावली होती. त्यामागे आर्क्टिक भागातील स्थानिक परिस्थितीत कोल्हे कसे राहतात हे पाहणे हा होता. हा कोल्हा येथील निसर्गात अनेक दिवस एकाच जागी राहिला मात्र नंतर समुद्राचा पृष्ठभाग गोठल्यावर त्याने हे ठिकाण सोडले आणि २१ दिवसात ९३९ मैलांचे अंतर कापले असे दिसून आले. १६ एप्रिल रोजी हा कोल्हा ग्रीनलँड ला पोहोचला होता. त्याने चार महिन्यात २७०० मैल अंतर पार केल्याचे संशोधकांना आढळले.

Leave a Comment