‘दिल चाहता है’चा सिक्वल येणार ?, फरहान म्हणतो…

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये जेव्हाही मैत्रीवर आधारित चित्रपटांचा उल्लेख येतो, त्यावेळी सर्वात आघाडीवर नाव दिल चाहता है या चित्रपटाचे येते. 2001 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट आजही आवडीने पाहायला जातो. चित्रपटाला 18 वर्ष पुर्ण झाल्याने चित्रपटाचा दिग्दर्शक फरहान अख्तरने इंस्टाग्रामवर चित्रपटाला 18 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल एक पोस्ट केली.

चित्रपटाला 18 वर्ष पुर्ण झाल्यानंतर आता प्रेक्षकांकडून चित्रपटाचा सिक्वल बनवण्याची मागणी केली जात आहे. #WeWantDCH2 देखील व्हायरल होत आहे.

प्रेक्षकांकडून होत असलेल्या या मागणीला दिग्दर्शक फरहान अख्तरने स्पष्टीकरण दिले आहे. फरहान अख्तरने स्पष्ट केले आहे की, सध्या तरी चित्रपटाचा सिक्वल बनवण्याचा कोणताही विचार नाही.

एका मुलाखतीमध्ये फरहानने स्पष्ट केले की, मी सध्या चित्रपटाला पुढे नेण्याविषयी विचार  करत नाहीये. मला असे वाटते की, कोणत्याही चित्रपटाला बनवण्यासाठी एक मूड, एक एनर्जी आणि वेळ असतो. मी त्या फेजमध्ये असतानाच ते शक्य झाले होते.

2001 मध्ये चित्रपट रिलीज झाल्यानंतर चित्रपटाची कथा आणि गाणी लोकांना खूप आवडली होती. चित्रपटासाठी गायक उदित नारायण यांना बेस्ट मेल प्लेबँक सिंगरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

Leave a Comment