पाकिस्तानमध्ये परफॉर्म केल्याने मिका सिंहवर भडकले चाहते

काही दिवसांपुर्वीच केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला. भारताचा हा निर्णय पाकिस्तानला चांगलाच झोबंला. पाकिस्तानने भारताच्या या निर्णयाला जोरदार विरोध करत, अनेक गोष्टी रद्द केल्या. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या या तणावाच्या परिस्थितीमध्ये गायक मिका सिंह पाकिस्तानात असून, त्याने तेथे परफॉर्म देखील केला आहे.

सांगितले जात आहे की, मिका सिंहने माजी राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफच्या एका नातेवाईकाच्या मेहंदीच्या कार्यक्रमात परफॉर्म केले. या परफॉर्मचा व्हिडीओ समोर आल्याने भारत आणि पाकिस्तानच्या ट्विटर युजर्सनी मिका सिंहला चांगलेच धारेवर धरले.

पाकिस्तानमधील प्रसिध्द पत्रकार नायला इनायतने ट्विट करत याबाबत माहिती दिली. तिने मिकाच्या परफॉर्म केल्याचा व्हिडीओ शेअर केला. शेअर करत तिने लिहिले की, बघून आनंद वाटला की, काही दिवसांपुर्वीच मिका सिंहने जनरल मुशर्रफच्या नातेवाईकाच्या मेहंदी कार्यक्रमात परफॉर्म केला. हीच गोष्ट जर नवाज शरीफ यांच्या नातेवाईकाच्या येथे झाली असती तर गद्दारीचे हँशटँग चालू झाले असते.

https://twitter.com/skmajumdar76/status/1160276607937835008

https://twitter.com/Karanvhora2/status/1160279592046718976

https://twitter.com/Mahnoor5551/status/1160227858742165504

नायलाच्या या ट्विटनंतर भारतीय ट्विटर युजर्सने देखील आपली नाराजी दर्शवली. दोन्ही देशांमध्ये तणाव सुरू असताना मिका सिंगने केलेल्या परफॉर्ममुळे भारतीय चाहते देखील नाराज झाले. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी कलाकरांवर भारतामध्ये बंदी घातली आहे. तसेच पाकिस्तानने देखील भारतीय चित्रपटांवर बंदी घातली आहे.

Leave a Comment