कचऱ्याच्या गाडीत चुकीने फेकले 16 लाख रूपये...पुढे काय झाले बघा - Majha Paper

कचऱ्याच्या गाडीत चुकीने फेकले 16 लाख रूपये…पुढे काय झाले बघा

कधी कधी न कळत एखादी वस्तू आपल्याकडून विसरून जाते किंवा चुकीने आपण महत्त्वाची वस्तू कचऱ्यामध्ये टाकून देतो. तुमच्याकडून देखील असे अनेकवेळा झाले असेल. मात्र विचार करा, जर नकळत तुम्ही आयुष्यभर केलेली कमाई कचऱ्याच्या डब्ब्यात टाकली तर ? तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल मात्र एका व्यक्तीने नकळतपणे 16 लाख रूपये कचऱ्याने भरलेल्या गाडीत टाकून दिले. त्याव्यक्तीला जेव्हा ही गोष्ट कळाली, तेव्हा तो हादरूनच गेला. अखेर त्या कचऱ्याच्या गाडीचा शोध घेतल्यानंतर 321 किलोमीटर लांब जाऊन ती गाडी सापडली.

अमेरिकेच्या ओरेगन शहरामध्ये एका व्यक्ती 23 हजार डॉलर म्हणजेच 16 लाख रूपये घरातील चप्प्लांच्या डब्ब्यात लपवून ठेवले होते. घराची सफाई करताना व्यक्तीने कचऱ्याबरोबरच तो चप्प्लांचा डब्बा देखील कचऱ्याच्या गाडीत टाकून दिला. काहीवेळा नंतर त्या व्यक्तीला ही गोष्ट समजली तेव्हा त्याने कपळावरच हात मारला.  अखेर त्या व्यक्तीने कचरा उचलणाऱ्या कंपनीचा नंबर शोधला व त्यांना घडलेली सर्व घटना सांगितली.

त्यानंतर त्याने त्या कचऱ्याच्या गाडीचा शोध घेण्यास सुरूवात केली. अमेरिकेत रहिवासी भागापासून कचरा लांब फेकला जात असल्याने ट्रक लांब निघून गेला होता. 321 किलोमीटर लांब गेल्यानंतर ट्रक थांबवण्यात आला व त्यात त्या व्यक्तीच्या डब्ब्याचा शोध घेण्यात आला. अखेर त्याला तो डब्बा सापडला. मात्र त्यात कमी पैसे होते. पैसे मोजल्यानंतर त्यात 22 हजार रूपये कमी होते. पैसे कमी निघाली तरी देखील त्या व्यक्तीने कोणतीही तक्रार केली नाही. पैसे सापडल्याने कचरा उचलणाऱ्या कंपनीचे त्या व्यक्तीने आभार मानले.

याआधी देखील अमेरिकत पैशांचा पाऊस पडत असल्याची घटना घडली होती. जॉर्जियातील अटलांटा येथून पैशांनी भरलेला ट्रकचा दरवाजा अचानक उघडल्याने ट्रकमधील नोटा बाहेर उडू लागल्या होत्या. लोकांनी देखील गाड्या थांबवत पैसे गोळा करण्यास सुरूवात केली होती.

Leave a Comment