तुम्हाला विकत घ्यायची आहे का जेम्स बॉण्डची ही कार

1960 च्या दशकात Aston Martin DB5 ही अनोखी कार जेम्स बॉण्डची प्रतिष्ठित कार समजली जात असे. कॅलिफोर्नियामध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या लिलावात 60 लाख डॉलर म्हणजे 42 करोड रूपयांमध्ये ही कार घेता येणार आहे. जेम्स बॉण्डची ही 1965 चे मॉडेल आहे. या कारमध्ये असे अनेक फिचर्स आहेत, जे बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

जेम्स बॉण्डच्या Aston Martin DB5 कारची विंड स्क्रीन बुलेटप्रुफ आहे. यावर मशीन गनचा देखील काहीही फरक पडत नाही. यामध्ये फुल बाँड मोडिफिकेशन्समध्ये एक बंदूक, व्हील-हब माउंटेड टायर स्लँशर्स, पँसेंजर सीट इजेक्शन सिस्टम, 30 कँलिबर मशीन गन यासारख्या गोष्टी पाहायला मिळतात.

जेम्स बॉण्डने आपल्या चित्रपटात 35 वर्ष या कारचा वापर केला. या कारची याआधी 2006 मध्ये विक्री करण्यात आली होती. त्यानंतर 2012 मध्ये यात नवीन बदल करण्यात आले.

Leave a Comment