अ‍ॅपलच्या त्रुटी शोधा आणि 7 कोटी रुपये मिळवा


आयफोनमधील तांत्रिक अडचणी शोधा आणि 7 करोड रूपये घेऊन जा, अशी ऑफर अँपलने जगभरातील सायबर रिसर्चर्सना दिली आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, फोनमधील तांत्रिक अडचणी किंवा अन्य काही अडचण असेल तर दाखवा आणि एक मिलियन डॉलर म्हणजेच 7 करोड रूपये घेऊन जावे.

कोणत्याही कंपनीकडून आतापर्यंत देण्यात आलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे. याआधी कंपनी केवळ त्यांच्याच रिसर्चर्सना बक्षीस आणि रक्कम देत असे. त्यांच्याच रिसर्चर्सना फोनमधील अडचणी शोधण्यासाठी बोलवत असे.

अमेरिकेतील लास व्हेगस येथे झालेल्या वार्षिक ब्लँक हँट सिक्युरिटी काँन्फरंसमध्ये कंपनीने सांगितले की, ही गोष्ट जगभरातील रिसर्चर्सना लागू असेल. मँक सॉफ्टवेअर आणि अन्य गोष्टीत सर्व मोठ्या अडचणी शोधणाऱ्यांना अनेक बक्षीसे दिली जातील.

रिपोर्टनुसार, लोकांच्या डिव्हाईसमधील माहिती मिळवण्यासाठी सरकारी काँन्ट्रँक्टर्स आणि ब्रोकर्स हँकिंगवर जवळपास 14 करोड रूपये खर्च करतात. त्याचबरोबर अँपल अनेक नवनवीन टॅक्नोलॉजी बाजारात आणत आहे. तसेच मॉडिफाईड फोनचा पर्याय देखील अँपल वापरत आहे.

Leave a Comment