‘या’ दिवशी रिलीज होणार राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’


लवकरच ‘मर्दानी’ या चित्रपटाच्या पुढील भागातून अभिनेत्री राणी मुखर्जी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा या चित्रपटातील नवा लूक समोर आला असून त्याचबरोबर चित्रपट कधी रिलीज होणार याची तारीख देखील जाहिर करण्यात आली आहे. ‘मर्दानी २’ हा राणीच्या ‘मर्दानी’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. ती महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका या चित्रपटात साकारत आहे.


तिचा ‘हिचकी’ हा चित्रपट मागच्या वर्षी रिलीज झाला होता. भारतासोबतच चीनच्या बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने दमदार यश मिळवले. ती आता ‘मर्दानी २’ चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गोपी पुतरन हे करत आहे. तर, या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करत आहेत. हा चित्रपट १३ डिसेंबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment