सावधान ! तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये होऊ शकते छेडछाड

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक मोठा ‘बग’ असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या बगमुळे तुमच्याद्वारे पाठवल्या जाणाऱ्या मेसेजमध्ये छेडछाड केली जाऊ शकतो व हँकर्स त्यामध्ये बदल करू शकतात. याबद्दलची माहिती अमेरिकन सिक्युरिटी फर्म चेक प्वाइंटने दिली आहे. या फर्मने लास व्हेगसमध्ये सुरू असलेल्या ब्लँक हाट नावाच्या सायबर सिक्युरिटी काँन्फरंसमध्ये प्रॅक्टिक्ल करून दाखवले.  चेक प्वाइंटने दावा केला आहे की, त्यांच्याकडे असे टूल आहे, ज्याच्या मदतीने कोणत्याही मेसेजमध्ये बदल करून चुकीचा मेसेज पाठवला जाऊ शकतो. कंपनीचे म्हणणे आहे की, हे टूल तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपच्या कोट रिप्लाई करताना काम करते. त्यामुळे रिप्लाई देताना त्यात फेरफार केला जाऊ शकतो.

उदाहरणाद्वारे समजा की, तुमच्या घरातील कोणाची तरी तब्येत अचानक खराब झाली आहे आणि तुम्ही बॉसला मेसेज केला की, खरातील कोणाची तरी तब्येत खराब झाली आहे. त्यामुळे मी ऑफिसला येऊ शकत नाही. आता या मेसेजला या टूलद्वारे बदलले जाऊ शकते. यामध्ये मी कुटूंबाबरोबर फिरत आहे, त्यामुळे ऑफिसला येऊ शकत नाही किंवा अन्य काहीही बदल केले जाऊ शकतात.

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये बग समोर येण्याची ही पहिलच वेळ नाही. याआधी मागील महिन्यात सिक्युरिटी फर्म Symantec च्या संशोधकांनी दावा केला होता की, व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलीग्राम अ‍ॅपमध्ये बग असून, त्याच्यामदतीने हँकर्स लोकांद्वारे पाठवलेल्या मीडिया फाइल्स एडिट करू शकतात. या बग ला मीडिया फाइल जँकिंग नाव देण्यात आले होते.

संशोधकांद्वारे ब्लॉगमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप मीडिया फाइलला एक्सटर्नल स्टोरेजमध्ये सेव्ह करते. तर टेलीग्राम गँलेरीत सेव्ह करते. त्यामुळे दोन्ही अ‍ॅप मीडिया फाइलवर लक्ष ठेवत नाही. अशावेळेस मीडिया फाइल्सवर जँकिंग अटँक होऊ शकतो आणि फाइल्सला एडिट केले जाऊ शकते.

Leave a Comment