ही पुणेकर गाढवीन बनली इंटरनेट क्रश

तुम्ही इंटरनेटवर अनेकांना गाणे गाताना पाहायले असेल. त्यांचे गाणे तुम्हाला आवडले देखील असेल. मात्र यावेळेस इंटरनेटवर गाढवाने गाणे गात लोकांचे मन जिंकले आहे. पुण्याच्या एनिमल शेल्टरमध्ये राहणाऱ्या एमिली नावाची गाढवीण सध्या सोशल मीडियावर स्टार झाली आहे. या गाढवीनीचा सुरेख आवाजात रेकण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मागील वर्षीच रेकॉर्ड करण्यात आलेला आहे.

या एनिमल शेल्टरमध्ये एमिलीबरोबरच मांजर, कुत्रे, गाय आणि म्हशी यांची काळजी घेतली जाते. एमिली रेकायला लागल्यावर स्टाफ देखील तिच्याबरोबर खेळू लागतो. स्टाफने रेकॉर्ड केलेल्या या व्हिडीओमध्ये एमिली रेकताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत, सर्वत्र व्हायरल झाला.

Emily the Singing Donkey!

After countless comments and messages demanding that we no longer hide her talent from the world, RESQ diva #EmilyTheDonkey finally decides to give her fans what they want 😀 Watch this video to hear India’s Singing Donkey, live in action!Want to support Emily at RESQ? Click here! www.resqct.org/sponsor-adopt/emilyPS: If you haven’t heard Harriet (Ireland's singing donkey)’s original serenade yet, follow Martin Stanton on Facebook to watch the full video!*Video rights for Harriet’s clip belong to Martin Stanton. Special thanks to The Dodo for sharing his gem of a video and helping the world see what amazing animals donkeys are!….#donkey #resq #resqct #rescuedonkey #emily #indiassingingdonkey #singingdonkey #harriet #galwaydonkey #donkeylove #irelandssingingdonkey #cute #animal #harrietthedonkey #rescueanimals #donkeys

Posted by RESQ CHARITABLE TRUST on Wednesday, November 21, 2018

रेस्क्यू चँरिटेबल ट्रस्टचे प्रमुख जेसिका रॉबर्ट्स म्हणाले की, सर्वसाधारणपणे आमच्या पेजवर गल्ली-बोळांमध्ये आजारी आणि जख्मी जनावरांना वाचवून आणलेले फोटो टाकले जातात. हे फोटो अनेकदा लोकांना दुखी करतात. त्यामुळे आम्ही एमिलीच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर करण्याचा निर्णय घेतला. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला. आम्हाला याचा विचार आयरलँडच्या एका गाणाऱ्या गाढवाचा व्हिडीओ बघून आला. तो ओपराच्या आवाजाप्रमाणे रेकायचा. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

जेसिका यांचे म्हणणे आहे की, एमिली रस्त्यावर अन्न शोधत असे. तेथूनच तिने गाणे गाण्यास सुरूवात केली असेल. जसे तिला जेवणाची थाळी समोर दिसते ती गायला सुरूवात करते. भारतात गाढवांवर अनेक अत्याचार केले जातात, त्यांना वाईट वागणूक दिली जाते. एमिलीचे आयुष्य देखील अडचणीत गेले असून, ती आता त्यातून बाहेर येत आहे. सेंटरच्या स्टाफला दोन वर्षा आधी ती जख्मी अवस्थेत सापडली होती.

Leave a Comment