लुडबूड करणे मांजरीला पडले महागात, शॉक बसल्यावर पुढे काय झाले बघाच

आपण मांजरींना सतत इकडे तिकडे उड्या मारताना बघत असतो. अनेकांना मांजरी आवडतात देखील. मात्र एका माजंरीला सतत उड्या मारणे, उचापत्या करणे चांगलेच महागात पडले आहे. एका ट्विटर युजरने शेअर केलेला मांजरीचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

@owurakuwaa नावाच्या ट्विटर युजरने आपल्या मांजरीचे चार फोटो शेअर केले आहे. घरामध्ये उघडा असलेल्या स्विचबोर्डमध्ये डोकावणे या मांजरीला चांगले महागात पडले. फोटो शेअर करताना युजरने लिहिले की, काल रात्रीत अतिउत्सुकतेमुळे मांजरीचा जीव गेला असता.

उघड्या स्विच बोर्डमध्ये तोंड घातल्याने शॉक लागल्यावर मांजरीचे तोंड आणि शरीर बघण्यासारखे झाले होते.

 

शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यंत 15,000 लाईक्स आले असून, शेकडो कमेंट्स आल्या आहेत. मांजरीचा चेहरा बघून ट्विटर युजर्स देखील आपले हसू रोखू शकले नाहीत.

Leave a Comment