माहीला मिस करतेय साक्षी आणि जीप ग्रांड चरॉकी


लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोनी सध्या दोन महिन्याच्या लष्करी सेवेसाठी काश्मीर मध्ये तैनात असून येत्या १५ ऑगस्टला त्यांच्या हस्ते लदाखमध्ये तिरंगा फडकाविला जाणार आहे. त्यामुळे त्यांची पत्नी साक्षी सध्या सैनिक पत्नीच्या भूमिकेत असून अन्य सैनिकांच्या पत्नीप्रमाणे पतीला मिस करते आहे. माहीच्या प्रतीक्षेत असलेल्या साक्षीने काही मजकूर आणि नवे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.


या फोटोत एक लाल रंगाची जीप ग्रँड चरॉकी दिसत असून साक्षी लिहिते, वेलकम होम, रेड बिस्ट, युवर टॉय इज फायनली हिअर, मिसिंग यु माही, रिअली मिसिंग यु.

वर्ल्ड कप नंतर धोनीने दोन महिने त्याच्या बटालियन सोबत देशसेवा करण्याची परवानगी मागितली होती आणि ती त्याला दिली गेली आहे. त्यानुसार माही सध्या काश्मीर भागात तैनात असून सैनिक सोबत्यांसह फुटबॉल खेळताना, जोडे पॉलिश करताना, गाणी म्हणतानाचे त्याचे व्हिडीओ शेअर केले जात आहेत. धोनीला कार्स आणि बाईकचा अतोनात शौक आहे आणि त्याच्याकडे अनेक चांगल्या कार्स, बाइक्सचे कलेक्शन आहे. त्यात १ कोटी रुपये किमतीची हमर, ऑडी क्यू, लँड रोव्हर, फरारी बरोबर मॉडीफाइड स्कोर्पियो सुद्धा आहे. त्यात आता चकचकीत लाल जीप ग्रांड चरॉकीची भर पडली आहे.

Leave a Comment