गँगस्टर नवरदेव आणि पोलीस कॉन्स्टेबल नवरीच्या एका लग्नाची गोष्ट


नवी दिल्ली – चक्क एका कुख्यात गँगस्टरशी एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने विवाह केल्याची बातमी समोर येत आहे. पारंपरिक पद्धतीने दोघांनी लग्न केले असून सोशल मीडियापासून सगळ्याच माध्यमांमध्ये या अनोख्या विवाहाची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. या कुख्यात गँगस्टर नवरदेवाचे राहुल ठसराना असे नाव आहे.

नोएडामध्ये 2014 साली मनमोहन योगल हत्याकांड झाले होते. कुख्यात अनील दुजाना या टोळीचा सक्रीय सदस्य असलेला राहुल ठसराना याप्रकरणी तुरुंगात गेला होता. अनील दुजानाचा राहुल हा विश्वासहार्य शुटर होता. राहुलला याप्रकरणी सुनावणीसाठी न्यायालयात हजर होण्यापूर्वी न्यायालयीन परिसरातील कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते. या महिला कॉन्स्टेबलकडे या कोठडीच्या संरक्षणाची जबाबदारी होती. न्यायालयात राहुल सुनावणीसाठी यायचा तेव्हा त्यांची भेट होत होती. या दरम्यान त्यांच्यात प्रेम झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. समाजाची पर्वा न करता त्यांनी मंदिरात जाऊन पारंपरिक पद्धतीने लग्न केले आहे.

Leave a Comment