
इटालियन मोटरसायकल कंपनी दुकातीने त्यांची नवी बाईक दुकाती डायवेल १२६० (Diavel १२६०) दोन व्हेरीयंट मध्ये भारतात शुक्रवारी लाँच केली आहे. १२९० स्टँडर्ड आणि १२६० एस अशी ही दोन व्हेरीयंट असून त्यांच्या किमती अनुक्रमे १७.७० लाख आणि १९.२५ लाख अश्या आहेत.
भारतात लाँच झाली दुकाती डायवेल १२६०
मस्क्युलर लुकच्या या बाईकना पहिल्या मॉडेलपेक्षा अधिक चांगले इंजिन आणि जादा फीचर्स दिली गेली आहेत. दोन्ही बाईकना १२६२ सीसीचे एकच इंजिन ६ स्पीड गिअरबॉक्ससह दिले गेले आहे. १२६० एस मध्ये क्लचलेस गिअर शिफ्टिंगसाठी क्विक शिफ्ट अप / डाऊन एवो सिस्टीम दिली गेली आहे. सिंगल पीस सीट, ट्वीन एलइडी टेललँप, सस्पेन्शन, ब्रेक कंपोनंट वेगवेगळे दिले गेले आहेत. बाईकला अर्बन, टुरिंग आणि स्पोर्ट असे तीन रायडींग मोड आणि कॉर्नारिंग एबीएस आहे. या बाईकचे बुकिंग सुरु झाले आहे.
