विंगकमांडर अभिनंदन मिग २१ वर स्वार होण्यास तयार


भारतीय वायूसेनेतील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पुन्हा एकदा मिग २१ लढाऊ विमान उडविण्यासाठी फिट ठरले असून येत्या १५ दिवसात ते पुन्हा फायटर पायलट म्हणून काम सुरु करणार आहेत. बंगलोरच्या आयएएफ इंस्टीट्युट ऑफ एरोस्पेस मेडिसिन मध्ये अभिनंदन यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या काटेखोरपणे केल्या गेल्या असून त्यात ते पास झाले आहेत त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा विमानोड्डाण करण्यासाठी पात्र ठरविले गेले आहे. तसे प्रमाणपत्र त्यांना शुक्रवारी दिले गेले आहे. जम्मू काश्मीर कलम ३७० रद्द केल्यामुळे भारत आणि पाकिस्तान याच्यातील तणाव वाढला असल्याच्या पार्श्वभूमीवर अभिनंदन यांची वापसी महत्वाची मानली जात आहे.

बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने केलेल्या एअरस्ट्राईक नंतर भारतीय हद्दीत घुसलेलल्या पाकिस्तानच्या एफ १६ विमानाचा पाठलाग अभिनंदन यांनी त्यांच्या मिग २१ बायसन मधून करून हे विमान पाडले होते पण त्या प्रयत्नांत त्याचे विमान पाकव्याप्त काश्मीर हद्दीत कोसळून त्यांना पॅराशूटच्या सहाय्याने उडी घ्यावी लागली होती. त्यानंतर त्यांना पाकिस्तान आर्मीने ताब्यात घेतले होते. त्यावेळी आपल्या अदम्य साहसाचा परिचय अभिनंदन यांनी करून दिला होता. त्याची तारीफ आजही होत आहे.

Leave a Comment