सोशल मीडियात होत आहे एकाच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या बाप-लेकीची चर्चा


सध्या सोशल मीडियावर मुंबईमधील एकाच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची चांगलीच चर्चा होत आहे. हे दोन विद्यार्थी म्हणजे चक्क वडील आणि मुलगी असून आहेत. यात एक खास गोष्ट जी म्हणजे या कॉलेजमध्ये वडीलांना मुलगी सिनिअर आहे. कॉलेज कॅम्पस आणि सोशल मीडियावर वडील-मुलीच्या या जोडीची चांगलीच चर्चा आहे. विद्यार्थिनी असलेल्या या मुलीने आपली कहाणी ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ नावाच्या फेसबुक पेजवर शेअर केली आहे.

या मुलीने ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ फेसबुक पेजवर आपली कहाणी सांगताना म्हटले आहे की, वडीलांची बालपणापासूनची वकिलीची पदवी घ्यावी ही इच्छा होती. पण, त्यांना आपले स्वप्न परिस्थितीमुळे पूर्ण करता आले नाही. एका कंपनीत ते कन्सल्टंट म्हणून काम करु लागले.

ही मुलगी पुढे म्हणते की, जेव्हा मी शिक्षण सुरु केले माझ्या अभ्यासक्रमाबद्दल तेव्हा वडीलांना उत्सुकता असायची. ते मला नेहमी माझा क्लास, विषय आणि तर सर्व गोष्टींबाबत विचारायचे. वडीलांची ही उत्सुकता पाहून कुटुंबियांनी निर्णय घेतला की, दुसऱ्यांदा त्यांना कॉलेजला पाठवायचे. कुटुंबीयांचा शब्द प्रमाण मानत त्यांनीही खरोखरच कॉलेजला कायद्याच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.

ही मुलगी ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ फेसबुक पेजवर म्हणते, आता एकाच कॉलेजमध्ये मी आणि माझे वडील शिकत आहोत. पण, मजेची गोष्ट अशी की, मी कॉलेजमध्ये वडीलांना सिनिअर आहे. तर, मला माझे वडील ज्युनीअर आहेत. फेसबुक पेजवरील ही पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत या पोस्टला 1200 पेक्षा अधिक लोकांनी शेअर केले आहे.

Leave a Comment