या पठ्ठ्याने चक्क नॅनोचे केले हेलिकॉप्टर!


पाटणा : बिहारमधील एका तरुणाने वैमानिक होण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याने अनोखी शक्कल लढवली. त्याने आपल्या ‘टाटा नॅनो’ कारचे रुपांतर चक्क एका हेलिकॉप्टरमध्ये केले. त्यांच्या स्वप्नाच्या पंखांनी त्याने ही झेप घेतली खरी, पण त्याचे हे हॅलिकॉप्टर प्रत्यक्षात आकाशात उडू शकणार नाही.

लहानपणापासूनच आकाशात उडाणाऱ्या विमानांचे बिहारमधील छपरा गावात राहणाऱ्या मिथिलेश प्रसाद याला आकर्षण होते. आपणही एक दिवस वैमानिक व्हायचे, असे स्वप्न त्याने उराशी बाळगले. त्याला त्याच्या आपल्या स्वप्नांचा मागोवा घेताना काही अडचणी आल्या आणि त्याचे पायलट होण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

मिथिलेश प्रसाद नियतीपुढे हार मानायला तयार नव्हता. आपल्या नॅनो गाडीलाच त्याने हेलिकॉप्टरचा रंग दिला. त्याने कोणतीच कसर गाडीचे रुपांतर हुबेहूब हेलिकॉप्टरमध्ये करण्यात ठेवलेली नाही. अंतर्गत रचना बदलण्यापासून हेलिकॉप्टरप्रमाणे शेपूट, पंखा अशा सर्व गोष्टी त्याने केल्या. आपल्या गाडीला त्याने हेलिकॉप्टरप्रमाणेही रंगही दिला.

आता आकाशात त्याचीही ‘हवाई कार’ उडू शकत नाही, हे त्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल. पण तो आपली आलिशान हेलिकॉप्टर कार बिहारमधील रस्त्यांवर थाटात मिरवतो. बिहारचा हा पठ्ठ्या कारला हेलिकॉप्टरचं रुप देणारा जगातील पहिलाच युवक नाही. अशीच प्रतिकृती चीनमधील एका शेतकऱ्यानेही निर्माण केली होती. त्याने त्यावर तीन लाख 74 हजार यूएस डॉलर (अंदाजे दोन कोटी 63 लाख रुपये) खर्च केले होते. पाकिस्तानातील एका पॉपकॉर्न विक्रेत्यानेही घरगुती विमान बांधले होते. त्याला हे करण्यासाठी कर्ज, जमिनीची विक्री असे उपद्व्याप करुन 90 हजार रुपये उभे करावे लागले होते.

Leave a Comment