नेटकऱ्यांना आवडला माकडाचा ‘देसी स्टाइल’ मधील कपडे धुण्याचा अंदाज


सध्याच्या डिजीटल युगात कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल याचा काही नेम नाही. कारण सोशल मीडियात दररोज व्हिडीओ मिनिटा मिनिटांना व्हायरल होत असतात. काही व्हिडिओमधील एखादा थरारक स्टंट, डान्स करण्याची पद्धत किंवा अन्य गोष्टी पाहून आपल्याला सुद्धा थक्क व्हायला होते. सध्या सोशल मीडियात अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात माकड चक्क देसी पद्धतीने कपडे धुताना दिसत आहे.


व्हायरल झालेला माकडाचा व्हिडिओ हा नेमका कधीचा आणि कोणत्या ठिकाणचा आहे हे कळू शकले नाही. पण नेटकऱ्यांना मात्र माकडाचा कपडे धुण्याचा देसी अंदाज चांगलाच आवडला आहे. अशाच पद्धतीने भारतीय नागरिकसुद्धा कपडे धुत असल्याचा प्रत्यय येथे दिसून येत आहे. पण माकडाची कपडे धुण्याची ही पद्धत नेटकऱ्यांना फार पसंद पडली असून तो व्हिडिओ प्रचंड प्रमाणात एकमेकांना शेअर केला जात आहे.

हा व्हिडिओ पाहून काही नेटकऱ्यांनी माकडाकडून काहीतरी शिका असे म्हटले आहे. तसेच माकडाने कपडे धुताना पाण्याचा केलेला वापर आणि पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेताना दिसून येत असल्याचे ही काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment