राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठीत भोंगा, तर हिंदीत अंधाधून ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट


नुकतीच ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यात आयुषमान खुराना, तब्बू आणि राधिका आपटे यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘अंधाधून’ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे. तर मराठीत ‘भोंगा’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रेक्षक-समीक्षकांकडून श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘अंधाधून’ या चित्रपटाचे चांगलेच कौतुक झाले होते. एक डोळस व्यक्ती अंधाच्या नजरेने जग शोधत असताना चित्रविचित्र घटना घडतात आणि चित्रपटाचा शेवट प्रेक्षकाला कोड्यात टाकतो. तर दुसरीकडे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी ‘भोंगा’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

अंधाधून चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, कृती महेश मिद्या व ज्योती तोमर यांना पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन, संजय लीला भन्साळी यांना पद्मावतसाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक, उरी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर, केजीएफ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.

दुसरीकडे भोंगा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर आयुष्मान खुराणा याच्या बधाई हो या चित्रपटाला पुरेपूर मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट, तर पॅडमॅन चित्रपटाला सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.

पाणी या चित्रपटाला पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट , स्वानंद किरकिरे यांना चुंबक चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सुरेखा सिक्री (बधाई हो) यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार मिळाला. पद्मावतमधील बिंते दिल गाण्यासाठी अरिजीत सिंगला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला. आयुषमान खुराना (अंधाधून), विकी कौशल (उरी) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला.

Leave a Comment