जगभरात काश्मीर या पदार्थांमुळे आहे प्रसिद्ध


केंद्रातील मोदी सरकारने मंगळवारी जम्मू- काश्मीरसाठी लागू असलेले कलम 370 हद्दपार केल्यानंतर या राज्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची आपल्यापैकी अनेकांची इच्छा आहे. त्यातच गुगलवर या राज्यातील रेसिपीही लोक सर्च करताना दिसत आहेत. त्याची काही माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

बासमती तांदूळात दूध, साखर आणि ड्रायफ्रूट्स टाकून येथे तयार होणारा काश्मिरी पुलाव हा तयार केला जातो. या पुलावाची चव ही अप्रतिम असते. हा पुलाव एकदा का खाल्ला की माणूस इतर सर्वच गोष्टींची चव विसरून जाईल. यात मटण टाकून नॉनव्हेज प्रेमी खातात.
दह्यात तयार करण्यात येणाऱ्या योगर्ट लँब करीत मावळची फुले, हिरवी आणि काळी वेलची आणि कांद्याची पेस्ट टाकली जाते. सुगंधीत आणि चवदार करण्यासाठी या करीत पुदीन्याची सुखी पाने टाकतात.

अनेकदा लग्न कार्यात तसेच सणासुदीच्या काळात रीस्टा हा पदार्थ तयार केला जातो. मसालेदार बोनलेस मीट आणि दह्याच्या ग्रेव्हीमध्ये हा पदार्थ तयार केला जातो.

थंडीच्या दिवसात काश्मीरी साग हा पदार्थ मोठ्या प्रमाणात केला जातो. हा पदार्थ कांदे, टॉमेटो, हिरव्या मिरच्या आणि मसाले टाकून तयार केला जातो.

काश्मीरमधील खास पदार्थांपैकी रोगन जोश हा एक पदार्थ आहे. मटणात तळलेले कांदे, मसाले आणि दही टाकून रोगन जोश तयार केले जाते. रोगन जोशची चव या पदार्थात असलेली काश्मीरी मिर्चीमुळे अप्रतिम असते. हा पदार्थ लाल दिसायला असतो.

पालकसारखे दिसायला हाक असते. मोहरीच्या तेलात हे तयार केले जाते. पालक मोहरीच्या तेलात मसाल्यांमध्ये जवळपास 30 मिनिटे शिजवले जाते. तयार झाल्यानंतर हाकची चव अप्रतिम असते. हा एक पौष्टिक पदार्थही आहे.

दही आणि कमल काकडीपासून तयार होणारी नदरू यखिनी ही एक शाकाहारी आमटी आहे. या आमटी चव वेलची आले आणि तमालपत्राच्या फोडणीमुळे अजून चांगली होते.

Leave a Comment