अमेरिका-चीनच्या भांडणात अंबानींना 17 हजार कोटींचा फटका


अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या ट्रेड वॉरमुळे अमेरिकेबरोबरच जगभरातील शेअर मार्केट खाली आले आहेत. एका रिपोर्टनुसार, यामुळे जगभरातील 500 श्रीमंतांची संपत्ती 8.19 लाख करोड रूपये कमी झाली आहे. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांचे तब्बल 16,800 करोड रुपयांचे नुकसान झाले आहे. मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रींमत व्यक्ती आहेत.

जगातील सर्वात श्रींमत व्यक्ती आणि अँमेझॉनची सीईओ जेफ बेझॉस यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यांची संपत्ती 10 अब्ज डॉलर  एवढी आहे.

ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्समधील 21 अरबपतींच्या शेअर्सची किंमत 1 अब्ज डॉलर ते 3.4 अब्ज डॉलरपर्यंत घसरले आहेत. या इंडेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी 18व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 3.14 लाख करोड रूपये एवढी आहे.

या श्रींमतांचे झाले नुकसान – 
जेफ बेझॉस – 3.4 अब्ज डॉलर
बर्नार्ड अरनॉल्ट – 3.2 अब्ज डॉलर
मार्क झुकरबर्ग – 2.8 अब्ज डॉलर
बिल गेट्स – 2 अब्ज डॉलर

Leave a Comment