वृक्षारोपण करा आणि 20 गुण अधिक मिळवा


छत्तीसगडमधील रायपूर शहरातील 7 खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करण्यासाठी 20 मार्क्स दिले जात आहेत. राज्याचा निसर्ग संरक्षणासाठी केला जाणारा हा असा पहिलाच अनोखा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरणाशी जोडण्यासाठी, त्याच्याशी संबंधीत जबाबदारी आणि जागृकता येण्यासाठी असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक ह्युमन राईट्सने शहरातील 7 शाळांना सोबत घेत हा उपक्रम सुरू केला आहे.

नर्चर नेचर प्रोजेक्ट अंतर्गत या शाळांमधील तिसरे ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थांना 6 हजार वृक्ष दिले जातील. जर पुर्णवर्ष झाड व्यवस्थित राहिले तर विद्यार्थ्यांना अंतिम निकालात झाडाच्या वाढीप्रमाणे 20 गुण प्रोजेक्टमध्ये अधिक दिले जातील. विद्यार्थ्यांनी अर्थ वॉरियर ही उपाधी देखील दिली जाईल.

यासाठी सर्व शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना झाडांची काळजी, लावण्याची पध्दत, सुरक्षा अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातील.

असोसिएशनचे राज्य अध्यक्ष पंकज चोप्राने सांगितले की, एका संशोधनानुसार भारतात पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी 14 हजार झाडांची आवश्यता आहे. झाडांद्वारेच आपण निसर्ग वाचवू शकतो. जर आपण मुलांना पर्यावरणाविषयी सांगितले तर ते त्याच्याशी जोडले जातील व त्यावर काम देखील करतील. हे काम पुढील पिढीसाठी असणार आहे.

मुलांना जी झाडे देण्यात येतील. ती त्यांना घराच्या आजूबाजूला लावावी लागणार आहेत व वर्षभर त्याची काळजी घ्यावी लागणार आहे. प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांना झाडाबरोबरच सेल्फी काढून शाळेत दाखवावा लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना अर्थ वॉरियरचे सर्टिफिकेट दिले जाईल.

तसेच, हा प्रोजेक्ट पर्यावरणाशी संबंधीत असल्याने यामध्ये निसर्गाचे जतन करण्यासाठी काळजी घेतली जाणार आहे. कागद बनवण्यासाठी झाडांचा वापर होतो. त्यामुळे देण्यात येणारे सर्टिफिकेट देखील डिजीटल असेल. तसेच कार्यक्रमाचे पोस्टर देखील डिजीटल असणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाची सेव्ह नेचर ही थीम टिकून राहील.

Leave a Comment