पाण्याच्या पृष्ठभागापासून अधिक उंचावरून चालते जगातील पहिली इलेक्ट्रिक जेट स्की


ऑस्ट्रेलियाची स्टार्टअप कंपनी इलेक्ट्रो ऐरोने एक खास जेट स्की वेवफ्लायर बनवली आहे. ही जेट दिसायला तर सर्वसाधारण जेट प्रमाणेच पण आहे. मात्र हे जेट पाण्यावरून नाही तर पाण्याच्या पृष्ठभागापासून अधिक उंचावर चालते. कंपनीचे म्हणणे आहे की, ही जगातील पहिले इलेक्ट्रिक हाइड्रोफॉयल पर्सनल वॉटरक्रॉफ्ट आहे. ही पारंपरिक जेट स्कीच्या तुलनेत खुपच हलके आणि शांत आहे. त्याचबरोबर अधिक एनर्जी एफिशियंट देखील आहे. कंपनीने याचे सध्या प्रोटोटाइप मॉडेल तयार केले असून, त्यावर काम सुरू आहे.

कंपनी याचे पेटंट करणार आहे. यामध्ये स्टेबेलाइज्ड ट्विन हाइड्रोफॉयल प्रोपल्शन सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. त्याच्या मदतीने ही इलेक्ट्रिक जेट पाणी कापत उंचावरून चालत. जणूकाही जेट उडतच आहे असे वाटते. सिंगल चार्जिंगमध्ये हे जेट 30 मिनिट चालते. यामध्ये 2 kwh पॉवर लिथियन आयन बँटरीचा पँक लावण्यात आला आहे. पेट्रोलने चालणाऱ्या जेट स्कीच्या तुलनेत इलेक्ट्रिक जेट दोन लोकांना घेऊ आरामशीर चालते. इलेक्ट्रिक जेट असल्याने प्रदूषण देखील होत नाही.

या वेव फ्लायरला यूनिवर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि पार्थ रिनेबल एनर्जी व्हीकल प्रोजेक्ट, पर्थ इलेक्ट्रो ऐरो अँन्ड गँलेक्सी रिसोर्सेस यांच्या भागिदारीमध्ये बनवण्यात आले आहे. सध्या प्रोटोटाइप मॉडेल तयार करण्यात आले असून, यावर काम सुरू आहे.

Leave a Comment