‘महापौर साहेब तुम्हाला शेकहँड करायला येतो आहे’


मुंबई – बृह्नमुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना काही दिवसांपूर्वीच नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. महापौरांनी त्यावेळीच सांताक्रूझ येथे एका महिलेचा हात पिरगळून तिला धमकी दिल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण अशी काही घटना घडलीच नसल्याचे म्हणत हे कटकारस्थान असल्याचा दावा महापौरांनी केला आहे. दरम्यान, याची दखल आता मनसेचे नेते नितीन नांदगावकर यांनी देखील घेतली असून एक व्हिडीओ त्यांनी जारी केला आहे. तुम्हाला शेकहँड करायला तुमच्या भेटीला येत असल्याचे नांदगावकरांनी या व्हिडीओत महापौरांना म्हटले आहे.

दरम्यान, ज्याप्रकारचे कृत्य महापौरांनी केले आम्ही त्याचा जाहीर निषेध करत असल्याचे नितीन नांदगावर म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीदेखील आठवण काढली. जर आज बाळासाहेब ठाकरे हे असते तर त्यांनी तुमची त्याच क्षणी हकालपट्टी केली असती. पण आता या गोष्टी होत नसल्याचे दुर्देव आहे. तुमच्या भेटीला मी येणार असून मला तुमच्याशी शेकहँड करायचा आहे आणि त्यापुढे काय होते हे पहायचे असल्याचे ते म्हणताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. कोणीही हा प्रकार घडत असताना बोलण्याव्यतिरिक्त त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नसल्याचे वाईट वाटत आहे. जो नियम माझा इतरांना लागू होतो तोच महापौरांनाही लागू होतो.

Leave a Comment