
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना याची मुख्य भूमिका असलेला सेक्शन 375 (Section 375) चा टीझर नुकताच रिलीज करण्यात असून तो तुम्हाला प्रभावित करेल. टीझरमध्ये रिचा चड्डा आणि अक्षय खन्ना एका विशिष्ट प्रकरणात न्यायालयात लढा देत असल्याचे दाखवले आहे. व्हिडिओमध्ये इतर देशांच्या तुलनेत बलात्काराच्या घटनांविषयीची तथ्ये आणि आकडेवारी देखील देण्यात आली आहे.
Section 375चा टीझर रिलीज
रिचा सरकारी वकील हिराल मेहता यांच्या भूमिकेत असून अक्षय गुन्हेगारी वकील तरुण सलूजाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात भारतीय दंड संहितेच्या कलम 375 च्या गैरवापरावर लक्ष केंद्रित केले गेले असून ज्याला बलात्कार विरोधी कायदा म्हणूनही ओळखले जाते.
या चित्रपटात रिचा आणि अक्षय व्यतिरिक्त मीरा चोप्रा, राहुल भट, झाकीर हुसेन आणि अतुल कुलकर्णी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अजय बहल दिग्दर्शित आणि कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि एससीआयपीएल निर्मित हा चित्रपट 13 सप्टेंबर 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.
