ह्युंदाईची नवीन कार होणार 20 ऑगस्टला लाँच


ह्युडंईने आपली नवीन कार ‘ग्रँड आय10 निओस’ची बुधवारी घोषणा केली. केवळ 11 हजार रूपये देऊन ही कार तुम्ही बुक करू शकता. या नवीन कारचे नाव ग्रँड आय10 निओस (Grand i10 Nios) आहे. निओसचा अर्थ मोर (MORE) आहे. नावावरूनच लक्षात येते की, या गाडीमध्ये अनेक नवीन गोष्टी, नवीन फिचर्स असणार आहे.

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही कार 20 ऑगस्टला लाँच होणार आहे. विशेष म्हणजे ही कार केवळ भारतीय बाजारातच उपलब्ध असणार आहे. तसेच याआधील मॉडेल ग्रँड आय10 ची विक्री देखील चालू राहणार आहे. कारण या गाडीच्या विक्रीमध्ये आजही वाढ होताना दिसत आहे. नवीन ग्रँड आय10 निओस ही कार मेट्रो शहरांना लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. यामध्ये नवीन टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे. कारच्या किंमतीबद्दल अद्याप माहिती मिळाली नसली तरी देखील सध्याच्या बाजारातील मॉडेल पेक्षा याची किंमत निश्चितच अधिक असणार आहे.

नवीन कारला नवीन डिजाईन आणि नवीन इंटीरियर असणार आहे. कंपनीने या गाडीचे फोटो देखील शेअर केले आहेत. डिझाईनमध्ये फ्रंट कँस्केट ग्रिल, इंटीग्रेटेड डीआरएल आणि प्रोजेक्टर हँडलँप या फिचर्सचा समावेश आहे. कारचे पुढील डिझाईन हे कंपनीची कार सेंट्रोशी मिळते जुळते आहे. याचबरोबर कारमध्ये स्टाईवलिश डॅशबोर्ड आहे. त्यामध्ये 8 इंचच्या टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिमचा समावेश आहे. सुरक्षिततेसाठी कारमध्ये एअरबँग्स, रियर पार्किंग सेंसर्स, फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर्स आणि स्पीड अलर्टसारखे फिचर्स आहेत. तसेच या कारचे इंजिन बीएस-6 एमिशननॉर्म्स प्रमाणे असणार आहे.

Leave a Comment