वैज्ञानिकांनी शोधले जगातील सर्वात पातळ सोने, बनवणार या वस्तू


सर्वसाधारणपणे सोन्याचा वापर हा दागिने बनवण्यासाठी केला जातो. मात्र ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी असे सोने तयार केले आहे ज्याचा वापर दुसऱ्या कामासाठी केला जाणार आहे. हे जगातील सर्वात पातळ सोने आहे. युनिवर्सिटी ऑफ लीड्सच्या संशोधकांनी हे पातळ सोने तयार केले आहे.

हे सोने मनुष्याच्या नखापेक्षा 10 लाख पट्टीने पातळ आहे. याची जाडी 0.47 नॅनोमीटर आहे. हे सोने दोन अणूंना मिळवून बनवण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे वापरले जाणाऱ्या सोन्यापेक्षा हे सोने 10 पट्टीने अधिक फायदेशीर असल्याचे सांगितले जात आहे.

वैज्ञानिकांनुसार, या 2-डी सोन्याचा वापर टेक्नोलॉजी बनवण्यास मदत होणार आहे. याचा वापर कँन्सरचा उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मेडिकल उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगामध्ये करण्यात येणार आहे. सध्या याचा वापर एअरोस्पेस इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील उपकरणे बनवण्यासाठी केला जात आहे.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, सोन्याचा हा प्रकार मेडिकल परिक्षणांमध्ये सुधारणा आणि पाणी साफ करण्याच्या प्रक्रियेला अधिक फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर याच्या वापरामुळे मशीनची किंमत देखील वाढणार आहे. त्यामुळे निर्मात्यांना देखील याचा फायदा होईल.

या शोधाशी संबंधीत प्रोफेसर स्टीफन इवांसचे म्हणणे आहे की, 2 डी सोन्याचा वापर करण्याची कल्पना आम्हाला आली आहे. अनेक गोष्टींसाठी याचा वापर करण्यात येईल. तसेच सध्याच्या तंत्रज्ञानामध्ये देखील हे अधिक फायदेशीर ठरेल.

Leave a Comment