'मच्छरांना रक्त पिऊ द्या', प्राणी हक्क कार्यकर्त्याचे अजब आवाहन - Majha Paper

‘मच्छरांना रक्त पिऊ द्या’, प्राणी हक्क कार्यकर्त्याचे अजब आवाहन


फ्रांसच्या प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी मच्छरांना न मारण्याचे आवाहन केले आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, मच्छरांना रक्त पिऊ द्या. मच्छरांना त्यांच्या बाळांचे पोषण करण्यासाठी याची गरज आहे. फ्रांस टिव्ही प्रेजेंटर आयमेरिक कँरन कोमोटो यांनी टिव्हीवर प्राणी हक्कांविषयी बोलताना याविषयी सांगितले.

कँरन यांना विचारण्यात आले की, मच्छर चावल्यावर काय कराव ? कँरन म्हणाले की, सर्व जीव-जंतूंबरोबर समान व्यवहार करायला हवा. त्यांना मारू नये. त्यांनी सांगितले की, मच्छर लोकांना प्रोटिनसाठी चावत असतात.  त्यांना अंडी आणि बाळांच्या विकासासाठी रक्ताची आवश्यकता असते.

ते म्हणाले की, मच्छर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वतःचे आयुष्य धोक्यात टाकतात. त्यांच्याकडे याच्याशिवाय काहीही पर्याय नसतो. कोणीही वेळोवेळी किड्यांना रक्तदान करू शकते. ते केवळ आपल्या मुलांच्या पोषणासाठी हे करत असतात. पशू प्रेमींनी मच्छरांना चावू द्यावे.

मलेरियाचा धोका बघून अफ्रिकेतील लोकांनी यापासून वाचावे. जर लोकांना स्वतःला चावू द्यायचे नसेल तर अशावेळे त्यांना मच्छरांना दूर ठेवण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. लँवेंडर ऑयल अथवा लसूनचा वापर त्यांनी करावा. कँरन यांच्या या वक्तव्यावर लोकांनी टिका केली आहे.

लोकांनी कँरन यांच्या या सुचनेला बावळटपणा आणि मुर्ख असल्याचे म्हटले आहे. तसेच,आणखी एक प्राणी हक्क कार्यकर्ते टोनी वर्नेली म्हणाले की, अनेक लोकांना ही गोष्ट समजलेली दिसत नाही. लोकांना शिक्षित करण्याचा हा योग्य पर्याय नाही. याचा प्राणींच्या कल्याणासाठी करण्यात येणाऱ्या कँम्पेनशी काहीही संबंध नाही. विश्व आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार, 2017 मध्ये मलेरियाचे 22 करोड प्रकरण समोर आले असून, यामध्ये 4,35,000 जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment