अशी आहे ‘साहो’मध्ये चंकी पांडेची भूमिका


सुरूवातीपासूनच प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘साहो’ हा बिग बजेट चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. श्रद्धा आणि प्रभास व्यतिरिक्त चित्रपटातील इतर कलाकारांचे पोस्टरही गेल्या काही दिवसांपासून रिलीज करण्यात येत आहेत. त्यातच आता चंकी पांडेचा चित्रपटातील लूक समोर आला आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो चंकी पांडेने शेअर केला आहे. तो खलनायकाच्या भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहे. तो चित्रपटात देवराज नावाचे पात्र साकारणार आहे. चंकी पांडेचा पोस्टरमधील लूक त्याच्या पात्राबद्दलची उत्कंठा वाढवणारा आहे.

दरम्यान प्रभास, श्रद्धा कपूर आणि चंकी पांडे यांच्याशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. निल नितीन मुकेशचा चित्रपटातील लूकही काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. येत्या ३० ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment