सुहाना खानच्या पहिल्या शॉर्ट फिल्मचे पोस्टर रिलीज


गेल्या बऱ्याच दिवसांपासून शाहरुख खानची मुलगी सुहाना हिच्या सिनेसृष्टीतील पदार्पणाविषयी चर्चा सुरू आहेत. सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या स्टारकिड्सपैकीच सुहाना ही एक असल्यामुळेच चाहते तिच्या पदार्पणविषयी जाणून घेण्यासाठी आतुर असतात. ती आता लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याची चाहुल लागली आहे. तत्पुर्वी एका शॉर्ट फिल्म द्वारे ती चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

नुकतेच सुहानाच्या पहिल्या शॉर्ट फिल्मचे पोस्टर रिलीज करण्यात आली आहे. चाहत्यांच्या या पोस्टरवर भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत. तिच्या आगामी शॉर्ट फिल्मचे नाव ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ (the grey part of blue) असे आहे. ‘थिओडोर जिमेनो’ (Theodore Gimeno) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

View this post on Instagram

#thegreypartofblue art by @olsdavis

A post shared by Theo Gimeno (@theodoregimeno) on


यासंदर्भात एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या शॉर्ट फिल्मचे शूटिंग सुहानाच्या कॉलेजमध्येच झाले आहे. तिचे शूटिंग दरम्यानचेही फोटो काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यामुळे शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून का होईना आता सुहानाच्या अभिनयाची झलक लवकरच चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment