रोहित शर्माच्या एकाच फोटोत दिसत आहेत तब्बल 600 षटकार!


गयाना : टी-20 मालिकेनंतर आता भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने याआधी टी-20 सामन्यात आपले वर्चस्व गाजवले असल्यामुळे एकदिवसीय मालिकेतही अशीच कामगिरी करण्यास विराटसेना सज्ज आहे. रोहित शर्माने पहिल्या दोन्ही टी-20 सामन्यात शानदार फलंदाजी केली, दरम्यान त्याला तिसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली. षटकार आणि चौकारांच्या मदतीने रोहितने चांगली फलंदाजी केली.

विश्वचषक स्पर्धेनंतर रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये असल्यामुळे वेस्ट इंडिज विरोधात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. दरम्यान रोहितने पहिल्या सामन्याआधी एक फोटो ट्विट केला. सध्या सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 900 षटकार या फोटोमध्ये दिसत आहेत. हा फोटो रोहित शर्मा आणि ख्रिस गेल यांचा आहे.


वेस्ट इंडिजचा सलामीचा फलंदाज ख्रिस गेल याच्यासोबतचा एक फोटो रोहित शर्माने शेअर केला. या दोघांचाही जर्सी क्रमांक 45 असून एकत्रतरित्या या दोन्ही धमाकेदार फलंदाजांनी 900 षटकार ठोकले आहेत. आपली शेवटची एकदिवसीय मालिका खेळणाऱ्या गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 529 षटकार लगावले आहेत. तर, रोहित शर्माच्या नावावर 371 षटकार आहेत. ख्रिस गेल हा सर्वात जास्त षटकार मारणारा फलंदाज आहे.

Leave a Comment