लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात सनी देओल 37 दिवसांपैकी 9 दिवसच हजर


लोकसभेतील अनुपस्थितीमुळे बॉलिवूड अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल सध्या चर्चेत आहे. सनी देओल पंजाबच्या गुरदासपूरमधून भाजपकडून खासदार म्हणून निवडून आला. पण लोकसभेच्या अधिवेशना दरम्यान सनी देओल गैरहजर असल्याचे समोर आले आहे.

लोकसभेतील पहिल्या अधिवेशनात सनी देओल 37 दिवसांपैकी 28 दिवस गैरहजर होता. सनी देओल पावसाळी अधिवेशनाचे दिवस वाढवल्यानंतर सलग पाच दिवस अधिवेशनाला उपस्थित राहिला. यानंतर संपूर्ण एक आठवडा गैरहजर होता.

सनीने पावसाळी अधिवेशनात फक्त 9 बैठकांमध्ये सहभाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी खासदारांना लोकसभेत वेळेवर उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. पण तरीही सनी देओलच्या या गैरहजरीमुळे मोदी किंवा अमित शहा काय निर्णय घेणार हे आगामी काळाच सांगेल.

सनी देओलने लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. सनी यानंतर पंजाबमधील गुरदासपूर या मंतदारसंघातून निवडणुकीसाठी उभा राहिला. काँग्रेस उमेदवार सुनील जाखड यांचा त्याने 82 हजार 459 मतांनी पराभव केला. याआधीही बॉलिवूड अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर राज्यसभेत अनेकदा गैरहजर राहिले होते. तेव्हाही अनेकांनी त्यांच्या गैरहजरीवर प्रश्न उपस्थित केले होते.

Leave a Comment