4 वर्षांच्या चिमुकलीने रचला आगळावेगळा विश्व विक्रम


एका लहान भारतीय मुलीने विश्व विक्रम आपल्या नावावर करत देशाचे नाव उंचावले आहे. चेन्नईमध्ये राहणाऱ्या या मुलीने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मुलीने 49 देशांचे झेंडे ओळखले आहेत व त्याचबरोबर त्या देशांच्या राजधानीचे नाव देखील सांगितले आहे. या मुलीचे नाव वेयाशिनी असून, या कामगिरीबरोबरच तिने विश्व विक्रम केला आहे.

4 वर्षांच्या या चिमुकलीने आशियाई देशांची नावे व राजधानी सांगितली.  तिने 49 देशांची नावे आणि राजधानी सांगण्यासाठी केवळ 84 सेंकदांचा वेळ घेतला. याआधीचा विक्रम देखील 4 वर्षीय मुलीच्या नावावरच होता. मात्र वेयाशिनीने देशांच्या नावाबरोबरच राजधानींची नावे सांगत विक्रम आपल्या नावावर केला.

वेयाशिनी देशांची नावे सांगत असताना त्यावेळी ट्रम्प वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी देखील उपस्थित होते. वेयाशिनीने विक्रम करताच तिला प्रमाणपत्र देण्यात आले. चिमुकलीच्या या कामगिरीने तिचे नातेवाईक आनंदात आहेत.

Leave a Comment