विनाश काले विपरित बु्द्धी, भारतावर हल्ला करण्याचे आदेश देऊ का ?


जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 हटवण्याचा व केंद्रशासित प्रदेश करण्याला दोन्ही संसदेने मंजूरी दिलेली आहे. मात्र भारताचा हा निर्णय पाकिस्तानला चांगला झोंबला असल्याचे दिसून येत आहे.

पाकिस्तानचे विरोधी पक्ष नेते आणि पीएमएल-एन नेता शहबाज शरीफ म्हणाले की, पाकिस्तान सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्यावरून कडक शब्दात उत्तर द्यायला हवे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी विरोधी पक्षांचे मागितले मत –
पंतप्रधान इम्रान खान यांनी शरीफ यांच्या विधानावर विचारले की, विरोधी पक्षाच्या नेत्यांना काय हवे आहे.? काय मी पाकिस्तानी सैन्याला भारतावर हल्ला करण्याचा आदेश द्यायला हवा ? इम्रान खान आणि इतर नेत्यांबरोबरच तेथील सैन्य देखील सरकारच्या या निर्णयावर भारताच्या विरोधात बोलताना दिसत आहे. तर पाकिस्तानचे मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी ट्विट केले की, मोदी सरकार जम्मू-काश्मीरला दुसरे पॅलेस्टाइन बनवू इच्छित आहे. पाकिस्तानच्या खासदरांनी भारताला रक्त, अश्रू आणि घामाने उत्तर द्यायला हवे. जर युध्द लादले गेले तर आम्ही युध्दासाठी तयार आहोत.

इम्रान खानने भारताला दिली धमकी –
इम्रान खानने संयुक्त सत्रामध्ये धमकी देत म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्याने पुलवामा सारखे हल्ले होतील. आम्ही या प्रकरणाला संयुक्त राष्ट्रात घेऊन जाऊ. आम्ही आंतरराष्ट्रीय समुहाला सांगू की, भाजपच्या नक्शलवादी विचारधारेमुळे भारतातील अल्पसंख्याकांना कशी वागणूक दिली जात आहे.

पाकिस्तान सेनेने केली बैठक –
पाकिस्तान सैन्याच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे कलम 370 हज्जस ट्विट करण्यात आले आहेत. यामध्ये सांगण्यात आले आहे की, काश्मीरच्या सध्या परिस्थितीबद्दल बैठक घेण्यात आली. सैन्य पाकिस्तान सरकारबरोबर आहे. पाकिस्तानची सैन्य भारताच्या या निर्णयाला नाकारते. पाकिस्तानने कलम 370 आणि 34 अ द्वारे जम्मू-काश्मीरवर ताबा घेण्याची कधीच मान्यता दिली नाही. पाकिस्तानचे सैन्य या अत्याचाराविरूध्द काश्मीरच्या लोकांबरोबर उभे आहे.

 

Leave a Comment