‘Blender’s Pride’ मुळे ट्रोल होत आहे प्रियंका चोप्रा


पती निक जोनाससोबत काही दिवसापूर्वी बॉलीवूडची देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्रा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली होती. पण त्यावेळी तिने केलेल्या एका चुकीमुळे तिला तोंडघशी पडण्याची पाळी आली होती. मियामी येथील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यात ती चक्क झुरका मारताना दिसत होती. पण ती चर्चा आता थांबत नाही तेवढ्यातच प्रियंका पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. यावेळी ती ‘ब्लेंडर्स प्राईड’ (Blender’s Pride) या मद्याच्या ब्रॅण्डची जाहिरात केल्यामुळे ट्रोल होत आहे.

ब्लेंडर्स प्राईड या मद्याच्या ब्रॅण्डची जाहिरात काही दिवसापूर्वी प्रियंकाने केली होती. प्रियंकाने सोशल मीडियावर या जाहिरातीच्या प्रमोशनचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी प्रियंका ट्रोल केले. त्याचबरोबर तुझा आता अस्थमा कुठे गेला ? असा प्रश्नही चाहत्यांनी विचारला.


ब्लेंडर्स प्राईड हा मद्याचा प्रकार असून अनेक आजार मद्यप्राशन केल्यामुळे होतात. त्यातच प्रियंकाला जर अस्थमा आहे. तर मग अशा जाहिराती तिने करुन या गोष्टींचे समर्थन करु नये, असे मत नेटकऱ्यांचे असल्यामुळेच त्यांनी प्रियंकाला ट्रोल केले आहे. तुझा अस्थमा आता कुठे गेला? फक्त तो भारतात आल्यावरच जाणवतो का ? असा प्रश्न एका चाहत्याने विचारला आहे. तर तू भारताबाहेर असताना बरी असतेस, असेही एकाने म्हटले आहे.

Leave a Comment