आता एकाच अॅपवर वापरता येणार सर्व बँकांची खाती


नवी दिल्ली – भीम अॅपमध्ये काही खास सुविधा सरकारी कंपनी असलेल्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया देणार आहे. विविध बँक खाती यामधून वापरकर्त्यांना एकाच अॅपमधून वापरता येणार आहेत. भीम अॅपची सुधारित आवृत्ती ही त्यासाठी ऑक्टोबरमध्ये लाँच करण्यात येणार आहे.

लवकरच भीम अॅप त्यासाठी अपडेट करण्यात येणार असल्यामुळे विविध बँक खाती एकाच अॅपमधून वापरकर्त्यांना वापरणे शक्य होणार असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले. खासगी देयक माध्यमांशी (पेमेंट प्लॅटफॉर्म्स) हे अॅप तगडी स्पर्धा करेल, असा विश्वासही अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

सध्या देयकाच्या विविध सेवा भीम अॅपमधून देण्यात येत आहेत. विविध व्यापाऱ्यांना त्यामध्ये आणखी सेवा देण्यात येणार असल्यामुळे वापरकर्त्याला भीम अॅपचा वापर करून विविध उत्पादने आणि सेवांचा लाभ घेता येणार आहे. जूनमध्ये भीम अॅपचा वापर करून १.५ कोटी आर्थिक व्यवहार पार पडले. ६ हजार २०२ कोटी रुपयांचे हे आर्थिक व्यवहार होते.

Leave a Comment