भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी शास्त्रीच कायम राहणार !


नवी दिल्ली – क्रिकेट सल्लागार समितीने भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी भारतीय व्यक्तीच नेमण्यात येणार असा संकेत दिल्यामुळे टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांचीच फेरनिवड होणार अशी शक्यता सर्वत्र वर्तवण्यात येत आहे.

याबाबतची माहिती टीम इंडियाचा प्रशिक्षक निवडण्यासाठी नेमलेल्या क्रिकेट सल्लागार समितीच्या एका सदस्याने दिली. ते म्हणाले, परदेशी प्रशिक्षक निवडण्याचा विचार आम्ही केला नाही. गॅरी कस्टर्नसारख्या महान खेळाडूंनी या पदासाठी जर अर्ज केला आहे, तर आम्ही अशा व्यक्तींचा विचार करु. पण, भारतीय प्रशिक्षक हीच आमची पहिली खरी पसंती राहील.

एका वृत्तसंस्थेला या सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाने शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली चांगली कामगिरी केली असल्यामुळे तेच सध्याच्या घडीला पुनरागमन करु शकतात असे म्हटले जात आहे. भारतीय क्रिकेट संघाचा नवीन प्रशिक्षक कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांची समिती निवडणार आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. मूडी यांच्याकडे प्रशिक्षकपदाचा खूप अनुभव आहे. न्यूझीलंडचे माजी आणि किंग्स इलेव्हन पंजाबचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनीही अर्ज केला आहे. भारतीयांमध्ये रॉबिन सिंह आणि लालचंद राजपूत यांनीही आपली दावेदारी सांगितली आहे.

Leave a Comment