टीम इंडियाचे हे फलंदाज जाहिरातीच्या माध्यमातून कमावतात खोऱ्याने पैसे


बीसीसीआय म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी असे म्हटले तर वावगे ठरु नये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बीसीसीआयचा काय दबदबा आहे ते आपल्या नव्याने सांगायची गरज नाही. कारण क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून बीसीसीआयकडे पाहिले जाते. याच बीसीसीआयने ज्या खेळाडूंना देशातर्फे खेळायची संधी दिले ते खेळाडू सध्याच्या घडीला खोऱ्याने पैसे कमवतात. पण आम्ही आज तुम्हाला त्या खेळाडूंची नावे आणि त्यांची कमाई सांगणार आहोत.

सध्या सर्वच क्षेत्रात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली अव्वल आहे. सध्याच्या घडीला सर्वात जास्त कमवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली एकमेव असा क्रिकेटपटू आहे. विराट केवळ जाहिरातीतून तब्बल 146 कोटी रुपये कमवतो. प्यूमा, एमआरएफ टायर आणि ऑडी सारख्या मोठ्या कंपनीच्या जाहिराती त्याच्याकडे आहेत. तर, विराटचा वार्षिक पगार तब्बल 7 कोटी आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनी 2014मध्ये सर्वात जास्त कमावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 25व्या क्रमांकावर होता. सध्या जाहिरातींमधून धोनी तब्बल 120 कोटी रुपये कमावतो. धोनीकडे सध्यस्थितीत रिबॉक, पेप्सिको आणि स्पार्टन स्पोर्ट्स यांच्यासारखे ब्रॅण्ड आहेत. तर, धोनीचा वार्षिक पगार हा 5 कोटी आहे.

युवा खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सर्वात जास्त कमवणारा खेळाडू आहे. जिलेट, गल्फ ऑयल आणि ओप्पो मोबाइल यांच्यासारख्या ब्रॅण्डच्या जाहिराती पांड्या करतो. जाहिरातींच्या जोरावर हार्दिकची कमाई 14 कोटी आहे. तर हार्दिक पांड्याचा वार्षिक पगार हा तीन कोटी रुपये आहे.

या यादीत भारताचा हिटमॅन रोहित शर्मा मागे नाही. रोहितला अलीकडेच बीसीसीआयच्या वतीने ए+ करारात सामिल करण्यात आले. सध्या आदिदास, अॅरिस्टोक्रॅट बॅग यांच्यासह अनेक मोठ्या ब्रॅण्डच्या जाहिराती रोहितकडे आहेत. तर रोहितचा वार्षिक पगार हा 7.2 कोटी आहे.

जाहिरातींच्या माध्यमातून गब्बर या नावाने प्रसिध्द असलेला शिखर धवनही खोऱ्यांने पैसे कमवतो. जीएस कॉलटेक्स, बोट आणि एल्किस स्पोर्ट्स यांच्यासारख्या ब्रॅण्डच्या जाहिराती त्याच्याकडे आहेत. जाहिरातींमधून धवन 5.2 कोटी कमवतो. बीसीसीआयकडून धवनला तब्बल 5 कोटी रुपये वार्षिक पगार मिळतो. त्यामुळे खोऱ्याने धावा काढणारे हे भारतीय संघाचे फलंदाज पैसेही खुप कमवतात.

Leave a Comment