फेसबुक करणार व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामचे नामकरण!


इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअॅपची सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने खरेदी केली आहे. पण फेसबुकबद्दल कोणतीही माहिती आतापर्यंत या अॅप्सवर नव्हती. फेसबुक सध्या इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअॅपला रिब्रँड करण्याची योजना करत आहे. संबंधित अॅपवर काम करणाऱ्यांना याची माहिती दिल्याचे आता एका रिपोर्टमधून समोर आले आहे.

द इन्फर्मेशन या न्यूज पोर्टलवर फेसबुकच्या रिब्रँडिंगबद्दल पहिल्यांदा रिपोर्ट प्रसिद्ध झाला होता. फेसबुकने त्यानंतर इन्स्टाग्राम आणि व्हाटसअॅपच्या नावात बदल होणार असल्याचे सांगितले होते.

लवकरच इन्स्टाग्रामचं नाव ‘Instagram from Facebook’ आणि व्हॉटसअॅपचं नाव ‘WhatsApp from Facebook’करण्यात येणार आहे. यासंदर्भात द व्हर्जने दिलेल्या वृत्तानुसार सध्यातरी फोन आणि टॅब्लेटच्या होमस्क्रीनवर अॅप्सची नावे तशीच राहतील. पण, नवे नाव पहिल्यांदाच अॅप इन्स्टॉल करणाऱ्यांना दिसेल.

आयओएस युजर्सना इन्स्टाग्रामवर सेटिंग पेजवर खालच्या बाजूला Instagram from Facebook’ असे दिसत आहे. ही बाब या वर्षी मार्च महिन्यात समोर आली होती. एका युजरने त्याबद्दल ट्विट केले होते. याबाबत फेसबुकने म्हटले आहे की, फेसबुककडून युजर्सना मिळणारी अॅप्स आणि सेवा याबद्दल आम्ही स्पष्टपणा आणू इच्छित आहे.

Leave a Comment