असा आहे ‘साहो’च्या खलनायकाचा लूक


मागील बऱ्याच काळापासून प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची जोडी असलेल्या ‘साहो’ चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत आहेत. आत्तापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला या चित्रपटाचा टीजर आणि दोन गाणी आली आहेत. फक्त श्रद्धा आणि प्रभासच्याच लूकची चर्चा आत्तापर्यंत झाली. पण, ‘साहो’च्या खलनायकाचा लूकही समोर आला आहे.

या चित्रपटात अभिनेता नील नितीन मुकेश खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला असून तो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


प्रत्येक गोष्टीचे उत्तर हे ‘शेवट’ असू शकत नसल्याची टॅगलाईन या पोस्टरला देण्यात आली आहे. आत्तापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये नीलने नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. आता तो ‘साहो’मध्ये देखील अॅक्शन अवतारात पाहायला मिळणार आहे. सुजीत यांनी ‘साहो’चे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट हिंदीसह तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेतही रिलीज होणार आहे.

Leave a Comment