केबीसीच्या ११ व्या पर्वासाठी सज्ज झाले अमिताभ बच्चन


‘कौन बनेगा करोडपती’ शो सोनी टीव्हीवर पुन्हा एकदा सुरू होत असून हजारो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा आणि अनेकांची स्वप्ने सत्यात उतरणारा हा शो आता ११ व्या पर्वात पोहोचला आहे. स्वतः अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवर याबद्दलची माहिती शेअर केली आहे.


ट्विटरवर कौन बनेगा करोडपती शोची अमिताभ बच्चन यांनी घोषणा केली आहे. २०१९ च्या नव्या अभियानाला लवकरच सुरुवात होत असून प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच हा शो येत असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. शोच्या सेटवरील फोटो अमिताभ यांनी शेअर केला आहे. लवकरच शोची तारीख जाहीर होईल. या शोमुळे प्रेक्षकांना आपल्या ज्ञानाच्या जोरावर नशिब बदलवण्याची संधी मिळत असते. काही चाचण्या स्पर्धक बनण्यासाठी द्याव्या लागतात. याची सुरुवात आता होत आहे.

Leave a Comment