राखीचा “घरमालक” ट्रम्प यांच्यासाठी करतो काम?


काही ना काही कुरापत करुन चर्चेत राहणारी बॉलीवूडची ड्रामा क्वीन अर्थात अभिनेत्री राखी सावंत सध्या तिने केलेल्या गुपचूप लग्नामुळे चर्चेत आहे. त्यानतंर आता राखीने एक आश्चर्यकारक वक्तव्य केले आहे. राखीने यावेळी आपल्या वक्तव्यात अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करत आपला नवरा त्यांच्यासाठी काम करत असल्याचे म्हटले आहे. ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राखी सावंतचा ब्राइडल लूक काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो पाहिल्यानंतर तिच्या लग्नाविषयीच्या अनेक चर्चांना उधाण आले होते. राखीने देखील या चर्चांना पूर्णविराम देत अखेर लग्न केल्याचे मान्य केले. मी एका एनआरआयसोबत लग्न केल्याचे राखीने एका मुलाखतीमध्ये बोलताना ती म्हणाली होती. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपनीमध्ये माझा नवरा काम करतो, असं ती म्हणाली आहे.

दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून राखी आणि तिच्या पतीची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी जेडब्ल्यू मॅरियटमधील एका रुममध्ये २८ जुलै रोजी लग्न केले. मात्र लग्नानंतर चित्रपटात काम मिळणार नाही, या भीतीपोटी तिने लग्नाचे वृत्त लपवून ठेवले होते, असे तिने सांगितले.

Leave a Comment