हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आहे आमिरची मुलगी इरा!


चंदेरी दुनियेपासून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याची मुलगी इरा चार हात लांबच राहते. पण ती सोशल मीडिया चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे असंख्य फॉलोअर्स आहेत. इरा काही दिवसांपूर्वी तिच्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आली होती. पण आता ती तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.


इराने शेअर केलेल्या फोटोमुळे सगळ्यांनाच तिचे याड लागले आहे असे म्हणायला हरकत नाही. इरा या फोटोत बेली पियर्सिंग आणि अ‍ॅब्ज फ्लॉन्ट करताना दिसत आहे. रेड ब्रालेट आणि डेनिम शॉट, मल्टिपल ब्रेड स्टाईल हेअर स्टाईल अशी तिची अदा आहे. ‘Who are you?’ असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.


इराने याआधीही Who are you? हा प्रश्न विचारत, त्याचे उत्तर स्वत:च दिले होते. या प्रश्नाचे उत्तर कधीच माझ्याकडे नव्हते आणि आत्ताही नाही. पण हा प्रश्न आयुष्यात काही वळणावर अद्यापही अनुत्तरीत आहे, यानेच मला आनंद दिला असल्याचे ती म्हणाली होती.


स्वत: इराने काही दिवसांपूर्वीच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून मिशाल कृपलानीला ती डेट करत असल्याचा खुलासा केला होता. यानंतर इरा व मिशाल यांचा एक रोमँटिक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.


इराने हा व्हिडीओ खुद्द शेअर केला होता. इरा व मिशाल यात व्हिडीओत कपल डान्स करताना दिसले होते. मला फक्त तुझ्यासोबत डान्स करायचा असल्याचे म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला होता.

View this post on Instagram

My better thirds❤

A post shared by Ira Khan (@khan.ira) on


इराच्या करिअरबद्दल सांगायचे झाल्यास, तिला चित्रपट निर्मितीत रस आहे. याबद्दलची माहिती अलीकडेच आमिरने दिली होती. मुलगी इराला चित्रपट निर्मितीमध्ये आणि मुलगा जुनैद याला अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असल्याचे तो म्हणाला होता.

Leave a Comment