दक्षिण आफ्रिकेची स्टेन गन थंडावली


मुंबई : आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने केली आहे. आपली कारकीर्द मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वाढवण्यासाठी कसोटीतून निवृत्त होण्याचा निर्णय स्टेनने घेतला.

क्रिकेटमधील माझ्या आवडत्या फॉरमॅटमधून मी निवृत्त होत आहे, स्टेनने निवृत्तीवेळी यानंतर वन डे आणि टी-20 क्रिकेटवर पूर्ण लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले. 2004 साली इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असलेल्या स्टेनने कसोटी पदार्पण केले होते. तर त्याने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.


दक्षिण आफ्रिकेकडून 36 वर्षीय डेल स्टेनने 93 कसोटी सामन्यात 22.95 च्या सरासरीने 439 विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये डेल स्टेनने 26 वेळा एकाच डावात पाचहून अधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. डेलच्या निवृत्तीच्या निर्णयाला दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दुजोरा दिला. कसोटी क्रिकेटमधून डेल स्टनने निवृत्तीची घोषणा केली असल्याचे ट्विट दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने केले आहे.

Leave a Comment