‘मुन्नी’च्या बिकिनी लुकने सोशल मीडियात लावली आग


सोशल मीडियावर दरवेळेस बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे बोल्ड फोटो व्हायरल होतच असतात. त्यातच आता तिचे नवे फोटो सोशल मीडियात आग लावत आहेत. पुन्हा एकदा बिकिनी फोटो पोस्ट करून मलायकाने सोशल मीडियावर खळबळ निर्माण केली आहे.


एका सुंदर बीचवर या फोटोंमध्ये मलायका बसलेली दिसत आहे. चाहत्यांना तिचा मल्टी कलर बिकिनी अवतार कमालीचा आवडला असून या फोटोंना काहीच तासांत हजारो लाईक्स मिळाले आहेत.


मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या अलिकडे चर्चेत आहेत. प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तावरुन अंदाज बांधायचा तर हे कपल लवकरच विवाहबंधनातही अडकू शकते. पण, दोघेही नेहमीच या वृत्ताचे खंडण करत आले आहेत. दोघे गेल्या काही काळात अनेकदा एकत्र दिसले आहेत.


मलायका दीर्घकाळापासून अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. अर्जुनचा गत ६ जुनला वाढदिवस होता. मलायकाने अर्जुनला बर्थ डे विश करताना, त्याच्यासोबतचे रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. शिवाय आपले नाते जगजाहिर केले होते.


मलायका व अर्जुन दोघांनीही सुरुवातीला आपले नाते जगापासून लपवून ठेवले. पण मलायका अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अगदी बिनधास्त अर्जुनसोबत फिरू लागली.


दोघांनी आपल्या प्रेमाची आणि नात्याची नुकतीच कबुली दिली. अर्जुन कपूर अलीकडे मलायकाच्या आई-वडिलांना भेटायला त्यांच्या घरी गेला होता.

View this post on Instagram

Kinda pensive …. 📸 @preetasukhtankar

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on


सोशल मीडियावर त्यांचे फोटो समोर आले होते. या फोटोंमध्ये मलायकाचे वडील अनिल अरोरा सुद्धा दिसले होते. या भेटीनंतर मलायका आणि अर्जुनच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे.

Leave a Comment