
आपल्या फिटनेसमुळे बॉलिवूड अभिनेत्री बेबो अर्थात करिना कपूर खान लोकप्रिय आहे. तिने तैमुरच्या जन्मानंतर फिटनेसच्या बाबतीत केलेला बदल पाहून भलेभलेही आश्चर्यचकित झाले होते.
तुम्ही देखील घायाळ व्हाल बेबोचा साडीतील हॉट अंदाज पाहून
सोशल मीडियावर त्यानंतर तिचे भरपूर फोटो व्हायरल झाले होते. त्यातच आता सध्याच्या घडीला तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ज्यामधील तिचा साडीतील हॉट लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो करिनाने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे.
तिचा पिंक कलरच्या शिमरी साडीमध्ये बोल्ड लूक या फोटोंमध्ये पाहायला मिळतो. तिच्या लाईट मेकअपने या बोल्ड लूकला परिपूर्ण केले आहे. तिने त्यासोबत घातलेली ज्वेलरी देखील आकर्षक दिसत आहे.
तैमुरच्या जन्मानंतर करिनाने बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक केले. पण ती विरे दी वेडींग या चित्रपटानंतर कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. आता लवकरच ती अंग्रेजी मीडियम आणि ‘गुड न्यूज’ या चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहे.
